समाजाच्या भविष्याचा विचार जर विवेकाच्या मार्गाने घडायचा असेल, तर ‘गांधीनगर’ हे त्या मार्गावरचे आश्वस्त करणारे एक स्थानक निश्चित असेल
एक अटळ वास्तव म्हणून भारताच्या फाळणीचा विचार करताना, या काळात धार्मिक मिषाने घडलेल्या अतोनात हिंसाचाराचा, दोन्ही बाजूंकडून दुबळ्या जीवांवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचा, उदध्वस्त कुटुंबांचा, परागंदा स्त्रियांचा विचार जसा प्राधान्याने करायला हवा, तसाच या फाळणीत होरपळलेल्या एका जनसमूहाने दुबळेपणाला दूर करत सक्षमपणे उभ्या केलेल्या गांधीनगरसारख्या व्यापारी वसाहतीच्या यशोगाथेचेही चिंतन करायला हवे.......